जळगाव – (प्रतिनिधी) – शहरात क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली सिटी स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन जळगाव, यांच्या वतीने शिरीष तायडे यांची महानगराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, निवडीचे पत्र जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते शिरीष कुमार भीमराव तायडे यांना नुकतेच देण्यात आले आहे, शिरिष तायडे यांची सिटी स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन जळगावचे महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजय काशीद, दिगंबर महाजन, भूषण लाडवंजारी, उमाकांत जाधव, उपस्थित होते शिरीष कुमार तायडे यांनी यापूर्वी सन २०१३ पासून गेल्या ११ वर्षात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच सन २०१८ साली त्यांनी विद्यापीठात सिनेट निवडणूक लढवून चांगली रंगत सिनेट दरम्यान आणली होती त्यात त्याचबरोबर नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या बैठकीस जळगावचे शिरीष ताडे यांची राष्ट्रीय पात्र बैठकीसाठी निवड झाली होती, याचबरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांनी समाज हिताचे विविध उपक्रम आजपर्यंत राबवलेले आहे तसेच शिरीष कुमार तायडे यांचे अभिनंदन उज्वलाताई बेंडाळे, आमदार राजू मामा भोळे, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, सुनील वाणी, भूषण लाडवंजारी यांच्या सह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.