<
एरंडोल(शैलैश चौधरी)-सर्वञ निवडणूकीचे वारे वाहू लागले असतानाच राजकीय मंडळींकडून तसेच उमेदवारांकडून काही ना काही राजकीय खेळी या खेळल्या जात असतात.शेवटी कोण लढणार व कुणाचे नशीब उजळते याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते.राजकीय समीकरणे तसेच टाकण्यात आलेला डाव तसेच कुणाचे सुखावणे तर कुणाचे दुखावणे हे होतच असते. वंचीत बहुजन आघाडीचे एरंडोल विधानसभा क्षेञातील बहुचर्चीत उमेदवार श्री.गोविंदआबा एकनाथ शिरोळे यांच्या नावाची सर्वञ चर्चा चालू असतांनाच त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व त्या निर्णयाची त्यांनी कारणमीमांसा त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केल्याने वंचीत असलेला बहुजन समाज हा दुखावला गेला असून याबाबत अधिक वृत्त असे की वंचीत बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली व त्यात पारोळ्यातील नामांकीत व प्रतिष्ठीत असे व्यापारी श्री.गोविंदआबा एकनाथ शिरोळे यांचे नाव एरंडोल विधानसभा उमेदवारीकरीता आल्याने त्यांचा राजकीय उमेदवारी बाबत प्रसारमाध्यमांनी कल जाणून घेतला असता त्यांनी दिलेल्या मुलाखतीत वेगळीच निर्णायक माहीती दिली तसेच त्याचे कारण देखील स्पष्ट केले यामुळे व त्यांच्या केलेल्या वक्तव्यामुळे सर्वार्थाने वंचीत असलेला बहुजन समाजात कमालीची अराजकता निर्माण झाली आहे. या त्यांच्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे व वक्तव्यामुळे जनतेप्रती किती कळवळा व आदर असल्याचे दिसून आल्याने त्यांनी बहुजन समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. यामुळे एकंदरीतच त्यांचे राजकीय भवितव्य हे जर-तर चा विषय ठरू पाहत आहे.
यास कारणही तसेच आहे मागील काळात त्यांनी जळगाव येथे भा. ज. पा. च्या इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली परंतू यूतीचे संकेत मिळाल्याने व मतदारसंघाची जागा सेनेला सुटत असल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचे ठरवल्याने बरोबरच वं. ब. आ. पक्षप्रमुखांना दिलेल्या निवेदनात आपले नाव वगळण्यात यावे अशी विनंती केल्याने व संभ्रम निर्माण झाल्याने बरोबरच वंचीत बहुजन समाजात लोकप्रियतेच्या वाटेवर असलेले शिरोळेंबाबत कमालीचे औदासिन्य निर्माण झाल्याने परीणामी बहूजनांचा रोष व नाराजी ओढवून घेतली आहे.