जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील ग्रंथालय विभाग तर्फे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत ग्रंथालयात दि. 30 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2024 पर्यंत ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले. सदर ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनास भेट दिली, सदर ग्रंथ प्रदर्शनात कथा, कादंबरी, कविता यासारखे वाचन साहित्य यांचा समावेश करण्यात आला.
तसेच महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली त्या मध्ये महाविद्यायतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी वाचन कसे करावे, वाचनाचा उपयोग यावर मार्गदर्शन केले, वाचन कौशल्य कार्यशाळेत विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी वाचन संवाद केले, त्या प्रसंगी ग्रंथपाल प्रा. किशोर भोळे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवाड्यात महाविद्यालयात वाचन सवयी, आवड निर्माण करण्यासाठी पुस्तक परीक्षण, मला आवडलेल पुस्तक असे उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.