Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे ‘एस’, ‘के पूर्व’, ‘जी उत्तर’ आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित;गळती दुरुस्तीचे कामकाज २४ तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2025
in मुंबई, राज्य
Reading Time: 1 min read

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे ‘एस’, ‘के पूर्व’, ‘जी उत्तर’ आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित;गळती दुरुस्तीचे कामकाज २४ तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन

पवई येथे जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्‍ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्‍यासाच्‍या तानसा जलवाहिनीला मोठी गळती लागल्याचे आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) पहाटे आढळून आले. त्‍यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

दुरुस्ती कार्यवाहीसाठी पवई ते धारावी दरम्‍यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामकाजाकरीता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्‍तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) पहाटेच्‍या सुमारास १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीत पवई व्हेंचरजवळ जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्‍ता पुलाजवळ (जेव्हीएलआर) मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी झडपा (व्हॉल्व्ह) तातडीने बंद करण्यात आल्‍या. गळती रोखून दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्‍यात आले आहे. लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दुरूस्‍ती अंतर्गत मुख्य जलवाहिन्यांचे पृथक्करण पवई ते मरोशीपर्यंत घेण्‍यात येणार आहे. या पृथक्करण कार्यवाहीमुळे के पूर्व विभाग, एस विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्‍तर विभागातील पाणीपुरवठा बाधित होणार आहे.

बाधित होणारे.परिसर

एस विभाग- गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्‍ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर
के पूर्व विभाग- ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्‍णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर
जी उत्तर- धारावी
एच पूर्व- बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस
जलवाहिनी दुरूस्‍ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रशासनाच्‍या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता;संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी

Next Post

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेंचा दुर्घटनेतील जखमींना दिलासा

Next Post
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेंचा दुर्घटनेतील जखमींना दिलासा

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेंचा दुर्घटनेतील जखमींना दिलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.