<
जळगाव- येथील रोटरी हॉलमध्ये किशोर पाटील कुंझर कर यांच्या शैक्षणिक सामाजिक तसेच बेटी बचाव बेटी पढाव व समाजकार्य क्षेत्रातील भरीव कार्याची व समाज प्रबोधना ची दखल घेऊन गौरव व सत्कार सन्मान समाज भूषण सन्मानपत्र विधानपरिषदेचे आमदार सौ स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी डॉ. निळकंठ गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जि प सदस्य पल्लवी ताई देशमुख, प्रकल्प अधिकारी निर्मलाताई पाटील, सौ वंदनाताई चौधरी, गोपाल दर्जी, श्रीराम पाटील, मराठा लाईव्ह चे अशोक शिंदे, प्रा. सुनील गरुड आर. बी. नाना पाटील, एस. एस. आबा प्रवीण पाटील, राम पवार, भगवान शिंदे, आकाश साळुंखे, भीमराव मराठे, बाळासाहेब सूर्यवंशी नंदू भाऊ देशमुख व अनेक आजी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा मराठा समाज मान्यवर मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती तसेच समाजाने एकत्रित येऊन माझा केलेला गौरव माझ्यासाठी प्रेरणा देणारा असून आतापर्यंत झालेल्या गौरव मध्ये ऊर्जा देणारा बळ देणारा मायेचा हात देणारा व आधार देणार आहे असे कुझरकर म्हणाले, सातत्याने निकोप भावनेतून सर्वांना मदत करणे हेच माझे जीवन विषयक संकल्पना असून भावी काळातही अशीच साथ सर्वांनी द्यावी ही प्रार्थना दरम्यान सकल मराठा समाजाने केलेल्या गौरवाबद्दल दूरध्वनीवरून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश दादा पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा सौ उज्वला ताई मच्छिंद्र पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट त्या भोळे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. डी एम देवांग माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, नरेंद्र चौधरी विश्वास पाटील विकास पाटील राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे समाजसेवक किशोर पाटील डॉ मणेकर आरोग्यदूत अरविंद देशमुख व सर्व शिक्षक संघटना सामाजिक संघटना पत्रकार संघटना पदाधिकारी आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देऊन कौतुक केले.