जळगाव-(प्रतिनिधी) – भूगोल मंडळाचे उद्घाटन भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे (स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांनी भूगोल दिनाचे महत्त्व भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इ.माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी सर होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा समन्वय साधला जातो .प्रत्येक विषय कसा एकमेकांशी पूरक असतो हे समजावून सांगितले आणि स्वतः परीक्षण करायला सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना चौधरी यांनी भूगोलाचे महत्व आणि मकर संक्रांत सूर्याचा मकर राशित कसा प्रवेश होतो त्याचबरोबर तीळ आणि गूळ यांचे महत्त्व सांगून प्रास्ताविक केले त्याचबरोबर पाहुण्यांचा परिचय व आभार मानले.
कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक राणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.