Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नर्सिंग GNM,ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी;उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/01/2025
in जळगाव, रोजगार
Reading Time: 1 min read
नर्सिंग GNM,ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी;उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव-(जिमाका वृत्त )- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

२५ ते ४५ वर्षे वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. उमेदवारांकडे घरगुती सहाय्यक सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती / फ्रीशीप योजनेंतर्गत अटींची पुर्तता करुन 31 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

Next Post
मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo