जळगाव -(प्रतिनिधी )- जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे जैन फार्म फ्रेश फुड्स लि. चित्तुर,आंध्रप्रदेश येथील वरिष्ठ व्यवस्थापकीय सदस्य समीर रमेश शर्मा (वय ५८) यांचे आज शुक्रवार दि.३१ जानेवारी ला सकाळी ८ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता, शर्मा बिल्डिंग, जीएमपी मार्केट समोर चित्रा चौक येथुन निघुन जळगाव येथील नेरी नाका वैकुंठधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहिणी व जैन इरिगेशनचे सहकारी तनुज शर्मा यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.