लोहारा ता. पाचोरा जि जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथुन जवळ असलेल्या म्हसास येथे काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसास येथे मुख्याध्यापक, विद्यार्थी पालक ह्याची सभा घेण्यात आली, सभेत विठ्ठल राठोड यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी व कल्पना पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली,तर सचिवपदी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव सर यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच शालेय व्यवस्थापन समिती मध्ये सर्व समाज घटकातील ११ विद्यार्थी पालक म्हणून सदस्य नेमण्यात आले,तर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गजानन पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी ह्यांनी केले,व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, या निवडी बद्दल परिसरातिल सर्व शिक्षण प्रेमिनी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले आहे.