लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
मैत्री जीवनाला सुंदर करणारे अदभूत रसायन म्हणजे मैत्री आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी पाऊलवाट, मैत्री म्हणजे अतुट विश्वास,आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही मैत्री अधिक दृढ करण्यासाठी सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञानाचा तितक्याच चपखलपणे वापर होताना दिसून येत आहे.अशाच १९९८ मध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या जुन्या वर्गमित्र मैत्रिणींना एकत्रित आणण्याची किमया सोशल मीडियाने केली आहे. लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी मंच सन १९९८ बॅचचा *गुरूपूजन समारंभ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा* मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे संस्थापक कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली, गेट टुगेदरच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी त्यांना पहिली ते दहावीला ज्या गुरूजनांनी ज्ञान दिले त्या सर्व गुरुंचे सत्कार श्रीफळ पुष्पगुच्छ , आणि विद्येची देवता सरस्वतीची मूर्ती देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्तव्यदक्ष माजी शिक्षक अस्वाल सर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून १९८९-९० मध्ये जि. प. मराठी मुलांची शाळेचे गुरुवर्य श्री. प्रभाकर चौधरी,माजी माध्यमिक शिक्षक व माजी मुख्याध्यापक श्री. राजेंद्र परदेशी, श्री. सी.एम.मोरे सर, श्री. अ.अ.पटेल सर, श्री. एस पी उदार सर, तसेच आताच्या मुख्याध्यापिकासो सौ. उज्वला शेळके मॅडम, उपशिक्षक श्री.पी एम सुर्वे सर होते.
माजी विद्यार्थ्यांपैकी प्रतिभा जगताप, अनिता चौधरी,विद्या पाटील,रवींद्र ओतारी,महिंद्र पाटील, संगीता शेळके, अनंत क्षीरसागर, यांनी सेवा निवृत्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे , कार्याचे पैलू उलगडून आठवणींना उजाळा दिला.ज्या व्यक्तीच्या जीवनात चांगले गुरू व चांगले मित्र असतात त्यांचे जीवन सफल होते हे सांगितले. तसेच वर्गमित्र सैनिक प्रसाद पवार ,गोपाल डांबरे,नारायण पवार हे आपल्या देशाचे कर्तव्य महत्त्वाचे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हाट्सअप द्वारे आपले मनोगत व्यक्त गुरुजनांबद्दल आदर व्यक्त केला व मित्रांची खूपच आठवण येते असे सांगितले .
सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय देत जुन्या आठवणी ताज्या केल्या.त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगतांना अनेकांना गहिवरून येत होते.
सर्व शिक्षकांनी सुध्दा जुन्या आठवणी सांगितल्या व आज पालक म्हणून माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्ये सांगितले .
स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष अस्वाल सर यांनी माजी विद्यार्थ्यांना जीवनातील खरे सुख हे लोककल्याणात, निसर्ग संगोपनात व सामाजिक बांधिलकी जपण्यात आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद पवार यांनी केले.
आभार अनंत क्षीरसागर यांनी मानले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यामध्ये प्रतिभा जगताप अनिल चौधरी विद्या पाटील भागवत तेली रवींद्र ओतारी महेंद्र पाटील संगीता शेळके यांनी जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. कार्यक्रमाचा समारोप वर्गमित्र सैनिक भिका जाधव यांच्या हातून केक कापून करण्यात आला. सर्व मित्र मैत्रिणींना एक ग्रुप फोटो फ्रेम आठवण म्हणून देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत क्षीरसागर, मनीषा राऊत, निता कल्याणकर,समाधान गीते,संगीता शेळके,अनिता चौधरी, सुशील पालीवाल, नितीन भामरे, ललित जैन, सुनील चौधरी,प्रकाश जाधव व सर्व १९९८ चे बॅचचे मित्र व मैत्रिणींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.