कसारा – (प्रतिनिधी) – येथे आज २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात ऐश्वर्या जगताप यांनी प्राण्यांविषयी विशेष माहिती सांगितली.
आयोजक संघटित नवतरुण मित्र मंडळ, कसारा, सागर सोनवणे, मंगेश उबाळे व सहकारी यांनी मला यावेळी प्राण्यांविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांशी माझे नाव जोडून प्रसिद्धी मिळत आहे आणि त्यांची सेवा करण्याचे जे माझे स्वप्न होते, त्या दिशेने एक मोठे पाऊल टाकुन वाटचाल होत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी ऐश्वर्या जगताप यांचा विशेष सन्मान नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष माननीय शशीजी उबाळे आणि पोलिस पाटील कसारा माननीय अशोकजी कर्डक यांच्या हस्ते करण्यात आला.
ऐश्वर्या पुढे बोलतांना म्हटल्या की, हे जे काही सर्व शक्य झाले आहे ते फक्त माझ्या कुटुंबामुळेच कारण माझे कुटुंबामुळेच कारण या प्राणी सेवेसाठी माझा सोबत माझा कुटुंबाचा सिहांचा वाटा आहे. ऐश्वर्या व त्यांच्या टीमचे सदस्य यांच्या सोबत – संस्थापक साक्षी दुबे, यश पंचार्या आणि संपूर्ण टीम जीवश्र्य ॲनिमल वेलफेअर शेल्टर ह्या संस्थाचे माध्यमातून– मिळून आम्ही अनेक प्राण्यांना वाचविण्याचे आणि त्यांची सेवा करण्याचे काम करत आहोत. या सन्मानाची संधी मला प्राण्यांची निःस्वार्थ सेवेमुळे मिळाली. प्राण्यांसाठी माझी ही सेवा अखंड सुरू राहील असाही संदेश त्यांनी यावेळी दिला.