लोहारा ता. पाचोरा जि जळगाव ( रिपोर्टर ईश्वर खरे)-येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त परिणाम धोबी समाज महासंघ सर्व भाषिक संघटनेतर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. गोपाला गोपाला नंदन गोपाला अज्ञात, अनिष्ट चालीरिती अंधश्रद्धा, अस्वच्छता, निरपेक्ष लोक जल सेवेचे व लोकशिक्षणाचे वृत स्विकारून ‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ अशी सरळ साधी शिकवण देणाऱ्या तसेच “भुकेल्या लोकांना अन्न द्या तहानलेल्यांना पानी द्या बेघर लोकांना आसरा द्या ” एवढा सहज आणि सोपा असनारा आध्यात्म विचार आयुष्यभर कृती परंपरेतून उभ्या महाराष्ट्राला समजून सांनाऱ्या निष्काम कर्मयोग बहुजनांचे उधांरक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त मान्यवरांनी विचारातून उजाळा दिला. यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश लिंगायत जिल्हा सचिव अरुण लिंगायत तालुका सल्लागार राजु लिंगायत लोहारा शाखा सचिव संजय शेवाळे लोहारा शाखा अध्यक्ष नितिन लिंगायत , शिवाजी लिंगायत, उमेश देशमुख, मनोज देशमुख, गोपाल कोळी, सुभाष बाविस्कर, अंबादास चौधरी, पत्रकार बांधव व समाज बांधव उपस्थित होते.