लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
मराठी मुलांनच्या शाळेत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकुण ११० रूग्णांची तपासणी करण्यात आली. लोहारा कुर्हाड जि. प. गटाचे भावी सदस्य आरोग्यदुत डॉ. सागर गरूड व विघ्नहर्ता मल्टिस्पेसिलीटी रुग्णालय यांच्या सौजन्याने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. विघ्नहर्ता रुग्णालय यांच्या रुग्णालय पथकातील डॉ जितेश पाटील, डॉ. सचिन वाघ, यांनी रूग्णांची तपासणी केली. तसेच वेगवेगळ्या तपासणी मधे परिचारिका स्वरस्वती गावित परिचर अक्षय कुमावत मा. जोतिबा फुले योजना आरोग्य मित्र निखिल भोई, भुषन पाटील, व्यवस्थापनातील नाना सोनवणे यांनी सहकार्य केले. आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी अक्षय देशमुख, गुनाआप्पा सरोदे, अतुल बरकले , उमेश देशमुख, ज्ञानेश्वर राजपूत, श्रीराम कलाल, आदिंनी परिश्रम घेतले.