जळगाव – (प्रतिनिधी)-दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी, समाजकार्य महाविद्यालयांची उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया: समस्या आणि उपाययोजना तसेच शिष्यवृत्ती योजना या विषयावर, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे प्रथम सत्रात उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी आर चौधरी, (सचिव, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव) यांनी भूषवले. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. कपिल सिंघेल (सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव) श्री सुनील महाजन (समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण विभाग, जळगाव) श्री गणेश वळवी (प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण विभाग जळगाव) प्रा. डॉ. अनिल हिवाळे (प्रमुख निमंत्रक तथा केंद्रीय सचिव, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, जळगाव) हे होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राहुल निकम (अध्यक्ष मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, जळगाव -पश्चिम) यांनी केले. डॉ. निकम यांनी आजवर समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या समाजकार्य महाविद्यालयांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. प्रमोशन, नियमित वेतन, डीसीपीएस, जीपीएफ, यासारख्या अनेक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून आता उच्च शिक्षण विभागाकडे वर्ग झाल्याने, या समस्यांतून मुक्त होऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा डॉ कपिल सिंघेल (सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, जळगाव) यांनी कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याच जाहीर करून कार्यशाळेच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय सचिव प्रा डॉ अनिल हिवाळे यांनी समाजकार्य महाविद्यालयाच्या न्यायिक हक्का संदर्भात आजवर संघटनात्मक पातळीवर केलेल्या कार्याची माहिती सांगितली. समाजकार्य महाविद्यालयांच्या अनेक प्रश्नांना विद्यापीठ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे, आणि मंत्रालय स्तरापर्यंत जाऊन संघटनेने कार्य केल्याची जाणीव करून दिली. इतर संघटनांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे देखील माहिती डॉ. हिवाळे यांनी सांगितली. सहसंचालक स्तरावरील प्रश्नांचा निपटारा लवकरात लवकर करावा, असे प्रशासनास आव्हान केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगावचे सचिव तथा कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी आजवर समाजकार्य महाविद्यालयांच्या अनेक समस्यांवर केलेल्या कार्याची माहिती सांगितली. विनाअनुदानित तत्वावर मिळालेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. समाज कल्याण विभागातील तीन स्तरीय प्रशासकीय कार्यप्रणाली असल्याने, अनेक लहान प्रश्नांचा निपटारा जिल्हा, प्रादेशिक कार्यालय आणि आयुक्त कार्यालया पर्यंतचा प्रवास हा दिरंगाईचा असल्याची भावना व्यक्त केली. कार्यशाळेसाठी सर्वांना शुभेच्छा देऊन, सहसंचालक कार्यालयातून प्रशासकीय कार्य तात्काळ होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ राकेश चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात उच्च व शिक्षण विभागाचे सहसंचालक श्री कपिल यांनी उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, उच्च शिक्षण विभागा कडून मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधांचे लाभ समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळतील. त्यांचे प्रलंबित प्रश्न सहसंचालक स्तरावरचे तात्काल निकाली काढण्यात येतील. शासनाच्या निर्देशानुसार CAS संदर्भात जवळपास सर्वच महाविद्यालयांची प्रकरणे मार्गी लावले आहेत. शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून समाजकार्य महाविद्यालयातील कोणतेही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येणार नाहीत, संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री गणेश वळवी यांनी शिष्यवृत्ती योजना व सेवा पुस्तक संदर्भात पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून माहिती करून दिली. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयाने लक्ष घालविण्याचे आवाहन केले. सर्विस बुकात कोणकोणत्या नोंदी अनिवार्य आहेत, याबाबत अनेक दाखले देऊन सर्विस बुक हे अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले.
कार्यशाळेच्या तृतीय सत्रात गटचर्चा समन्वयक प्रा डॉ शाम सोनवणे, (उपाध्यक्ष, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, जळगाव) यांच्या समन्वयातून प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, जळगाव प्रा डॉ कपिल सिंघेल, प्रशासन अधिकारी श्री गणेश वळवी, सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी सुनील महाजन, मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय सचिव प्रा डॉ अनिल हिवाळे यांनी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव प्रा डॉ कपिल सिंघेल, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी सचिव प्राचार्य पी आर चौधरी, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर चे अध्यक्ष श्री अभिजीत भांडारकर, संघटनेचे केंद्रीय सचिव डॉ अनिल हिवाळे, उच्च शिक्षण विभागचे गणेश वळवी, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ राकेश चौधरी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्राचार्य डॉ पी एस पाटील, समाजकार्य महाविद्यालय, तळोदा येथील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी समाज कल्याण निरीक्षक श्री सुनील महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विद्या शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत महाजन सह विद्यापीठ परिक्षेत्रातील 55 प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहसंचालक कार्यालयातील श्री नंदू चव्हाण, मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ जयवंत मगर, केंद्रीय सचिव प्रा. डॉ अनिल हिवाळे, जळगाव पश्चिमचे अध्यक्ष प्रा डॉ राहुल निकम, जळगाव पूर्वचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. शाम सोनवणे, आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य राकेश चौधरी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. आलेल्या सदस्यांची नोंदणी डॉ. अशोक हनवते, डॉ भारती गायकवाड यांनी केली. कार्यशाळेचे सूत्रसंचलन संघटनेचे उपाध्यक्ष डॉ शाम सोनवणे यांनी सूत्र संचलन केले.
सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून सहसंचालक कार्यालयातील श्री नंदू चव्हाण आणि प्रा डॉ. शाम सोनवणे व प्रा डॉ राहुल निकम यांनी काम पाहिले.