जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील नामांकित विधिज्ञ अँड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयामार्फत नोटरी पद बहाल करण्यात आले आहे. या निवडीमुळे त्यांना आता कायदेशीर दस्तऐवजांच्या नोटरीकरणासाठी अधिकृत अधिकार प्राप्त झाले आहेत.
नोटरी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका असून, त्यामार्फत विविध प्रकारचे कायदेशीर व्यवहार, प्रतिज्ञापत्रे, करारनामा, डिक्लरेशन यासारख्या दस्तऐवजांचे प्रमाणिकरण केले जाते. अँड. आनंद मुजुमदार यांचा कायद्यामधील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, आणि जनतेत असलेला विश्वास यामुळे त्यांना हे पद बहाल करण्यात आले आहे. ते मनपा चीफ लीगल ऑफिसर सुधा आहेत. शिवाय विविध महत्वाचा संस्था समित्यांवर कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
या यशामुळे त्यांच्या सहकाऱ्यांत, मित्रपरिवारात आणि जळगाव जिल्ह्यातील विधिज्ञ मंडळात आनंदाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*”ही नियुक्ती म्हणजे केवळ माझ्या कार्याचा सन्मान नाही, तर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी नवे दार खुले झाले आहे,”* असे अँड.आनंद मुजुमदार यांनी सांगितले.