लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे )

लोहारा येथुन जवळच असलेल्या कासमपुरा येथेल श्री.राम सीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासंमपुरा यांच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक विठ्ठल-पांडुरंग वेशभूषा करून दिंडीत भाग घेतला. पालखी सजवून हरिनामाचा गजर करत परिसर दुमदुमून गेला होता.

या पायी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषा करून भक्तिभावाने सहभाग घेतला. टाळ- मृदंगाच्या गजरात हरिपाठ, अभंग आणि भजनांनी वातावरण पवित्र झाले होते. विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी अभंग किर्तन तसेच फुघड्या खेळून कार्यक्रमांमध्ये रंग भरला,यावेळी शाळेचे संस्थाचालक श्री योगेश दादा यांनाही याचा मोह आवरला गेला नाही त्यांनी देखील सहपत्नीक कार्यक्रमात सहभागी होऊन फुगडी खेळली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे संस्था अध्यक्ष श्रि .योगशदादा राजपुत, मेघाताई राजपूत, सरपंच सतिश राजपूत,मुख्याध्यापक श्री. किरण चौधरी सर श्री. तायडे सर ढोणी सर, महाजन सर,तसेच सर्व शिक्षकवृंद, प्रशिक्षित कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीने मोलाचे सहकार्य केले.

संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक जाणीव आणि समाजाभिमुखता निर्माण व्हावी, हा उद्देश ठेवण्यात येतो. या दिंडी सोहळ्या निमित्त गावातून व परिसरातुन महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.











