<
जळगाव-(ग्रामीण विषेश प्रतिनिधी)- तालुक्यातील पडसोद येथील शासकीय गटातुन लाखो ब्रास गौण खनिज मातीची वाहतुक ५ ते ७ वर्षापासून १ पोकलॅन व ७ ते ८ डंपर च्या सहाय्याने चोरट्या पध्दतीने सुरु आहे.
याबाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील पडसोद गावातील शासकीय गट क्रमांक १७० या गटातुन गावातीलच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिड ते २ किलोमीटर अंतर व १५ ते २० फुट खोल एवढ्या मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करुन वाहतुक केल्याची व्हिडिओ चित्रीकरण सह तक्रार सामाजिक कार्यकर्ता विकास चुडामण बाविस्कर यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडे २३ मे रोजी करण्यात आली होती.
विभागिय आयुक्त कार्यालय नाशिक येथील महसूल तहसीलदार बबन काकडे यांनी तात्काळ दखल घेऊन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे की सदर तक्रार अर्जावर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे आदेशित केले असतांना देखील तब्बल दिड महिना उलटून गेला तरी कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. तसेच तक्रारदार यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, अवैध माती उत्खनन मध्ये पडसोद येथील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी पार्टनरशिप मध्ये हे उत्खनन केले आहे व यास गावातील कुणी विरोध केल्यास त्याला संबंधितांकडून धमकावले जाते.
अवैधरीत्या माती उत्खनन करुन संबधितांना करोडोंचा फायदा झाल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. महसूल प्रशासनाने सदर गट १७० या ठिकाणी पंचनामा करून मोजमाप करावे व पाच पटिने दंड वसूल करण्यात यावा असे बाविस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत जळगाव तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होऊ शकला नाही. तसेच तक्रारदार यांनी अर्जात म्हटले आहे की, माझ्या व माझ्या कुटुंबांतील सदस्यांच्या जिवितास काही बरेेेवाईट झाल्यास संबधितांना जबाबदार धरण्यात यावे. शासनाचा लाखोंचा महसुल बुडवनारे यांच्या वर महसुल प्रशासन मेहेरबान असल्याची दबक्या आवाजात गावकर्यांमध्ये चर्चा तर महसूल प्रशासनाच्या कारवाई कडे सर्व गावकर्यांचे लक्ष लागुन आहे.