<
युतिचे उमेदवार आ. किशोर आप्पा पाटील यांच्यापुढे आव्हान
भडगाव /पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – अमोलभाऊ शिंदे यांनी शुक्रवार रोजी पाचोरा भडगाव विधानसभेसाठी भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी त्यांनी शहरातील आठवडे बाजारात भव्य प्रचार सभा घेतली प्रचार सभेत शिवव्याख्याते प्रदीप देसले कजगाव शिवव्याख्याते संजीव सोनवणे चोपडा पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सभेला संबोधित केले.
अपक्ष उमेदवार अमोल भाऊ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली पुढे ते म्हणाले की कालच्या प्रचार सभेत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माझ्यावर टीका करताना म्हणाले ती त्यांच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जनता हाच माझा पक्ष तेच माझं चिन्ह आहे आज या ठिकाणी जनता आलेली आहे. ती परिवर्तन करण्यासाठी आलेले आहे किशोर आप्पा म्हणाले की मी मी या ची चोरिया पोऱ्या या विषयी बोलणार नाही परंतु आज मात्र त्यांना या पोऱ्या बद्दल बोलावे लागत आहे. मला त्यांनी चार वेळा कुत्रा म्हटले भावड्या म्हटले आता त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते म्हणतात मतदार संघात मी आठशे कोटीचा विकास केला त्यांनी केलेला विकास मला दाखवा विकास म्हणजे काय हे मी त्यांना सांगतो व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे संचालक कल्पेश संगवी गणि शहा नगरसेवक मनिष भोसले रफिक बागवान रहीम बागवान नजीर पठाण भारतीय जनता पक्षाचे किशोर संचेती भाजपचे माजी नगरसेवक युवराज लोणारी रमेश वाणी सुधिर पुणेकर प्रदीप संचेती भाजपच्या महिला शहराध्यक्ष रेखाताई पाटील अॅड. जे डी काटकर डॉ. मनीष देशमुख किशोर पाटील बाळू नाना सुरेश दळवी शरद खैरनार परेश पाटील सर तांबोळी एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गिरणे पतसंस्थेचे सर्व संचालक कृष्णापुरी सोसायटीचे सर्व संचालक आणि अमोल भाऊ शिंदे शिंदे परीवार प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मिरज मुनोत आभार तेजस पाटील यांनी केले. सभा संपल्यानंतर भव्य रॅली आठवडे बाजार येथून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधी चौक जामनेर रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांत राजेंद्र कचरे यांच्या कार्यालयात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.