दापोरी तालुका एरंडोल – (प्रतिनिधी )-येथील रहिवासी व वावडदा तालुका जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे दिनेश ईश्वरलाल पाटील यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महेंद्र काबरा,शालिक मालकर आदींची उपस्थिती होती.दिनेश पाटील यांचे सामाजिक व विद्युत क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असते.हे योगदान लक्षात घेवून त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करीत असल्याचे राजनंदिनी संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे. राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील व वावडदा, दापोरी परिसरातील नागरिकांनी दिनेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे.











