Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2025
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिक- (प्रतिनिधी)-नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, जेल रोड परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉली फ्लॉवर हायस्कूलच्या मागील वस्तीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून ती गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान घडली. सदर तरुणी घरा जवळच्या कामानिमित्त बाहेर गेली असता १० ते १२ मोकाट कुत्र्यांनी अचानक तिच्याभोवती घेरा घातला आणि जोरदार हल्ला चढवला. सतत चावा घेत तीच्यावर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड ऐकून धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले आणि जखमी तरुणीला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार सुरू केले आहेत.

मनपाच्या कुत्रेमुक्ती मोहिमेचा फज्जा

नाशिक महानगरपालिकेने वेळोवेळी मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहिमा राबवण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र कुत्र्यांची संख्या नियंत्रणात नसून वाढतानाच दिसते, अशी नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांचा आरोप—

“तक्रार केली तरी मनपा प्रशासन हालचाल करत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय त्यांना जागच येत नाही.”

जेल रोड, इंदिरानगर, पंचवटी, सीबीएस परिसरासह संपूर्ण शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचे गट फिरताना दिसत असून विशेषतः विद्यार्थी, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांकडून मनपाला सवाल

✅ कुत्र्यांना पकडण्याची मोहिम का थांबली?
✅ किती कुत्र्यांचे बंध्याकरण झाले?
✅ जबाबदारी कोणाची?
✅ हल्ल्यांवरील आकडेवारी सार्वजनिक का नाही?

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

परिसरातील नागरिक व सामाजिक संघटनांनी या घटनेची मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांची मागणी —

मोकाट कुत्र्यांना ताबडतोब पकडून व्यवस्थापन करावे

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी तातडीचे पथक स्थापन करावेही घटना नाशिक महापालिकेच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह उभे करते.ना

गरिकांचा जीव धोक्यात घालून प्रशासन किती काळ डोळेझाक करणार? यापुढे असे हल्ले टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

Next Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

Next Post
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d