Saturday, June 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/12/2025
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथे स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.

अभिवादन पर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून, भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा. येथील प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदणकर, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. डॉ. भरत खंडागळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या समाजकार्य अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद रायपुरे, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. डॉ. यशवंत महाजन, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र लडे, इ. मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शाम सोनवणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेतून सांगितले की, ब्रिटिश प्रशासनात फौजदार पदावर कार्यरत असताना, त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन, देश सेवेत स्वतःला समर्पण करून घेतले. महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाचे घोषणा करत असताना, कर्मयोगी धनाजी नानाचे कार्य डोळ्यासमोर ठेवून, खिरोदा आणि फैजपूर परिसरात पहिले ग्रामीण अधिवेशन भरवले. कार्याध्यक्ष म्हणून *कर्मयोगी धनाजी नानावर* जबाबदारी सोपवली, जी त्यांनी अतिशय उल्लेखनीय रित्या पूर्ण करून दाखवली. असे अनेक उदाहरणं देऊन कर्मयोगी धनाजी नानांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगितली. प्राचार्य डॉ ईश्वर सौंदणकर व प्रा. डॉ. यशवंत महाजन यांनी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण केले. धनाजी नाना चौधरी प्रबोधनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव येथील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन पर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात;राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

Next Post

माहिती अधिकार (RTI) शुल्काबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; नवीन कार्यपद्धती जाहीर

Next Post
Private:

माहिती अधिकार (RTI) शुल्काबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; नवीन कार्यपद्धती जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo