<
पप्पा मी रोज शाळेत जातो.खड्डे इतके आडवे येतात कि, मला सायकल चालवता येत नाही. म्हणून रिक्षा लावली.तो खड्डे टाळत टाळत इतका हळू चालतो कि,मला शाळेत उशीर होतो.मी शाळेत जाणे बंद करू का?
मी पायी चालत गेलो तर रिक्षा,कार,फटफटी इतक्या वाकड्या तिकड्या होतात कि,जसे मला चेंदायलाच आल्या.खड्ड्यातील गारा,चिखल,पाणी अंगावर उडून युनिफॉर्म घाण होतो.सर,रागावतात मला.मी शाळेत जाणे बंद करू का?
पप्पा मला कार घेऊन द्या आणि रोज शाळेत पोहचवा,म्हणतो.पण म्हणे आपली ऐपत नाही. मग,मी शाळेतच मुक्काम करू का?
पप्पा तुम्ही या खड्डे भरण्यासाठी आमदाराला सांगा.नगरपालिकेला सांगा.पण तुमची हिंमत होत नाही. म्हणे बेटा,मी नोकरी करतो.माझी तक्रार वरिष्ठांना केली तर मला त्रास देतील.मग,पप्पा ,मी शाळेत जाणे बंद का?
तुम्ही म्हणता,थांब बेटा.बनतील रस्ते. मी रोज वाट पाहातो.पांच वर्षात आपल्या गल्लीत एकदाही रस्ता बनला नाही.पप्पा तुम्ही का घाबरता,आमदाराला?पप्पा, टिव्हीमधे मी रोज पाहातो,ऐकतो.मोदीसाहेब रोज सांगतात,मेरी मनकी बात सुनो.पण माझ्या शाळेच्या रस्त्याचे कधीच बोलत नाही.त्यांनी चंद्रावर यान उतरवले.पण येथे जळगाव ला सायकल चालवता येत नाही. पप्पा ,मी टिव्ही पाहाणे बंद करू का?
तुम्ही दरवेळी ला निवडणुकीत उमेदवार कडून पैसे घेता.त्या पैशांनी सायकल ही विकत घेत नाहीत.तरी तुम्ही पैसे घेता.आणि मत देता.मग,मी काय करू? शाळेत जाणे बंद करू का?
पप्पा तुम्हीच म्हणाले मम्मीला.आपण जळगाव ला जाऊ.घर बांधू.बाळ शाळेत जाईल.शिक्षण घेईल.मोठा होईल.आफिसर होईल.प्रोफेसर होईल.
पण जळगाव ला तर माझी शाळा बंद करायची वेळ आली.माझे तीन मित्र खड्यात मेले. त्यापेक्षा आपले पाळधी काय वाईट होते?शाळा जवळ होती.रस्ते चांगले होते.पप्पा,तुम्ही मला शाळेत सोडून द्यायचे.मम्मी घ्यायला यायची.जातांना आम्ही बाजार करायचो.खाऊ घ्यायचो.येथे जळगाव ला तर खाऊचे जाऊ द्या,रोज मरायची भीती वाटते.त्यापेक्षा,मी शाळा बंद करू का?तुम्हाला ही टेन्शन नको.मम्मीला ही टेन्शन नको.
तुम्ही घ्या पैसे.द्या मत.कोणालाही द्या.मी शाळेत जाणे बंद करतो.
जळगाव शहर अपक्ष उमेदवार – शिवराम पाटील. 9270963122.