Monday, April 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2026
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

 

भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळा दि. ७ सप्टेंबर १९९३ ला झाला होता. त्यावेळी आशाताई भोसले व ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडेदादा यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे, साधेपणाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने झालेला संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे. त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशी स्वरसम्राज्ञी आता आपल्यात नसली तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील.:-अशोक भवरलाल जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

Leave a ReplyCancel reply

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d