<
ग्राहकांची दिशाभूल करुन आरोग्य विम्याचा नावाखाली जमवताय अर्थार्जन
जळगांव(विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. पण, मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई खातेधारकांना नाहक शुल्क लावून बँका करतात की काय, अशी चर्चाही सध्या सुरू आहे. खातेधारकांना पूर्वसूचना न देता त्यांचे पैसे कापून घेणे. खातेधारकाने बँकेकडे विचारणा केली असता, तेव्हा ती आरोग्य विमा फी म्हणून वसूल केल्याचे बँकेने स्पष्ट केले. ही खातेधारकांची लूट नव्हे तर काय? अशीच घटना स्टेट बँक ऑफ इंडिया जळगांव मुख्य शाखेत घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर ग्राहक बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी गेले असता, बँकेचे अधिकारी ग्राहकांकडून अकाउंट फॉर्म भरून घेत असतात, भरून म्हणजेच सह्या घेतात वगैरे, ग्राहकाला काही कळत नाही. कोणता फॉर्म कसला आहे, त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना याचा चांगला फायदा घेता येतो, वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या घेऊन झाल्यावर आपले अकाउंट सुरु झाल्याचे सांगितले जाते.व अकाउंट मध्ये आता आपल्याला किमान ४ हजार भरावे लागतील असे सांगण्यात येते, त्यावर ग्राहकाने विचारले कि ३००० हजार मिनिमम बॅलेन्स ठेवावे लागते. तर त्यांनी सांगितले कि नाही ४००० हजार ठेवावे लागतील. त्यांवर ग्राहकाकडून आपल्या खात्यात ४००० हजार रुपये भरण्यात आले व व बँकेकडून पासबुक देण्यात आले.त्यानंतर ८ ते १० दिवसांनी बँकेचा मॅसेज आला त्यात १००० हजार रुपये बँकेकडून कपात करण्यात आली आहे. यांनतर दुसऱ्या दिवशी ग्राहकाने बँकेत जाऊन या बाबत चौकशी केली असता हि गंभीर बाब समोर आली त्यांनी १००० हजार रुपयाचा आरोग्य विमा काढून घेतलेला आहे. त्यांना ग्राहकाने विचारले कि आम्हाला न विचारता आमचा आरोग्य विमा का काढण्यात आला तर त्यांनी सांगितले कि जेव्हा आपण अकाउंट ओपन केले तेव्हा तुम्ही आरोग्य विम्याचा फॉर्म भरून दिला होता व आपणास पूर्व सूचना देण्यात आली होती.पण ग्राहकास अकाउंट ओपन करतांना कोणत्याही आरोग्य विमा विषयी सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ग्राहकाची दिशाभूल करून परस्पर त्याच्याकडून अकाउंट ओपनिंग च्या नावाखाली विम्याचा फॉर्म भरून घेतला असल्याची बाब उघड झाली आहे. ही कपात म्हणजे बँक ग्राहकांवर अन्याय आहे. तरी याबाबत सदर पैसे परत मिळाले पाहिजे असे ग्राहकाचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती साठी संपर्क दिपक सपकाळे मो.नं.- ९३७०६५३१००