<
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव, दि. 5:- जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणविषयक विविध बाबींचे तसेच पेन्शन व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी नोव्हेंबर, 2019 मध्ये माजी सैनिक मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांनी आपल्याला असलेल्या अडीअडचणी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ऑक्टोबरअखेर पर्यंत द्याव्यात. तसेच स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांच्या मेळाव्यात ज्या इच्छूक माजीसैनिक व त्यांचे अवलंबितांना उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी सुध्दा आपली नोंदणी करावी, असे आवाहन श्री. कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.