Saturday, June 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2026
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

मुंबई-(विशेष वृत्त) – भारतीय हवामान विभागाने यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सुनिश्चित करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत.

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जारी केलेल्या शासन पत्रानुसार, राज्यातील धरणे, जलाशय व इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित अथवा सुरू असलेली पाणी आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने स्पष्ट केले आहे की, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला पाणीसाठा इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही. तसेच ग्रामीण व शहरी भागांना अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक पाणीसाठा सुरक्षित ठेवून त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी परस्पर समन्वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा, असेही शासनाने म्हटले आहे. धरणे, कालवे, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी व गस्त घालून अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप आदी साधनसामग्रीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचन आवर्तने बंद करणे आणि बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo