Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

Desk Team by Desk Team
30/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

जळगाव दि. २९ प्रतिनिधी : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. विद्यार्थ्यांना गुरुचे जीवनातील महत्त्व, भारतीय गुरु-परंपरा तसेच महान विभूतींच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या पावन प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांप्रती सदैव आदर आणि कृतज्ञतेची भावना जपण्यास तसेच महान विभूतींच्या शिकवणीचा आपल्या जीवनात अंगीकार करण्यास प्रेरित केले.

गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी सुंदर पुष्पे आणून त्यांचे पूजन केले आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी गुरुची महती आणि भक्तिभाव व्यक्त करणारी सुंदर भजने व भक्तिगीते सादर केली. त्यांच्या मधुर गायनामुळे विद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमात शिक्षकांनी भारताच्या गुरु-परंपरेतील प्रेरणादायी महापुरुषांच्या जीवनावर विशेष सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना भगवान महावीर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, आचार्य चाणक्य, आर्यभट्ट, गुरु नानकदेव, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनकार्याची व शिकवणीची माहिती देण्यात आली. या महान विभूतींच्या जीवनातून विद्यार्थ्यांना अहिंसा, आत्मसंयम, करुणा, मानवता, समानता, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिश्रम, दूरदृष्टी, सेवा आणि लोककल्याण यांसारख्या जीवनमूल्यांची प्रेरणा मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रद्धापूर्वक माता सरस्वती, महर्षी वेदव्यास तसेच अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हा संदेश देण्यात आला की, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. गुरुचे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. गुरुपौर्णिमेचा हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सण न राहता गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि ज्ञानाबद्दल समर्पणाची भावना जागविणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. भारतीय ज्ञानपरंपरेतील महान गुरु आणि विभूतींच्या विचारांशी विद्यार्थ्यांना जोडणारा हा कार्यक्रम अत्यंत अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

Desk Team

Previous Post

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo