Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

Desk Team by Desk Team
15/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

खर्ची बु:- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खर्ची बु. येथील जि. प. प्राथमिक शाळा तसेच नवीन तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.या प्रसंगी प्रा. योगेश माळी, समाजकार्य विभाग. जि. प. शिक्षिका. रेखा बाविस्कर, श्रीमती माधुरी बाविस्कर, सौ. प्रीती चौधरी, आशा सेविका सुनीताताई माळी, प्रतिभा माळी व महिला मंडळ, तसेच गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती माधुरी बाविस्कर मॅडम यांनी पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांनी समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळाच्या वतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, वृक्षारोपण हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी राहुल बागुल, रोशन देशमुख, नंदिनी पवार, माहेश्वरी वसावे, रोहिणी वळवी, तसेच कोतवाल, भूषण म्हसके, विशाल माळी व रुपेश सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला मंडळातील सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक पेड माँ के नाम” या संदेशातून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Desk Team

Previous Post

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

Next Post

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

Next Post
*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.