Wednesday, November 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/11/2026
in जळगाव, विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव-(जिमाका) :- राज्यातील महाविद्यालयांचे शासकीय कामकाज अधिक गतिमान, सुलभ व पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विभागीय सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. विभागाचे तयार केलेल्या नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन प्रणालीद्वारे शासनाशी संबंधित ९८ ते ९९ टक्के कामकाज सध्या डिजिटल पद्धतीने होत असून, राज्यातील सुमारे सहा हजार महाविद्यालयांच्या कामकाजाला अधिक गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जळगाव येथे विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. पराग मसराम, कार्यकारी अभियंता आर.डी. पाटील,उप विभागीय अभियंता एस एल देवरे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाची ही पहिलीच अत्याधुनिक व प्रशस्त अशी इमारत असल्याचे सांगून,
मंत्री श्री. पाटील म्हणाले, ऑनलाइन प्रणाली च्या माध्यमातून महाविद्यालयातील वैद्यकीय देयके, निवृत्तीवेतन प्रस्ताव आणि प्राध्यापकांचे वेतन सुरू करण्यासारखी कामे सुलभ झाली असली तरी महाविद्यालयांचे शासनाशी संबंधित विविध प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे यासाठी सहसंचालक कार्यालय असणे आवश्यक आहे त्यामुळे आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा विचार सुरू आहे. महाविद्यालयांनी सामाजिक उत्तरदायित्वातून
गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था सुरू करावी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर फिल्टर आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
शहरी व ग्रामीण महाविद्यालयांनी परस्पर समन्वयातून विद्यार्थ्यांना मदतीचे जाळे निर्माण करावे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य समजून या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी शुद्धीकरण आणि सांडपाण्याच्या पुनर्वापराचे उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जानेवारीनंतर दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह संबंधित घटकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आतापासून नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासाठी महाविद्यालयांना सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि त्यांच्यातील एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी पुणे येथे प्राध्यापकांसाठी मोफत समुपदेशन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या धर्तीवर एकल विद्यार्थ्यांसाठीही विशेष योजना राबविण्याचा शासन स्तरावर विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाविद्यालयांच्या खात्यांमध्ये विविध शिष्यवृत्तीचे वर्षानुवर्षापासून शुल्क प्रतिपूर्तीचा प्रलंबित निधी पडून आहे तो वापरता येत नाही त्यासाठी नियमानुसार परवानगी घेऊन, तो निधी, महाविद्यालयातील वसतिगृहे, स्वच्छतागृहे व अन्य मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापर करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, मानसिक स्वास्थ्य आणि महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य देत उच्च शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री पाटील यांनी यावेळी काही महाविद्यालयाच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी सहसंचालक कार्यालयाच्या नवीन अद्यावत इमारतीची पाहणी करू समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo