<
जळगाव – (विषेश प्रतिनिधी) – येथील अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडे माहिती च्या अधिकारान्वये CCTV कॅमेरे फुटेज ची माहिती मागितली होती परंतु कॅमेरे असुन देखील माहीती देण्यास नकार दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, दिनांक १० जुन २०१९ रोजी माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी जळगाव येथील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या कडे माहितीचा अधिकार २००५ अन्वये अर्ज सादर केला होता व त्यात माहिती मागितली होती की, आपल्या कार्यालयातील सर्व CCTV कॅमेर्यांचे फुटेज DVD किंवा CD स्वरुपात मिळावेत.
परंतु जनमाहिती अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी ३ जुलै २०१९ रोजी पत्र पाठवले व त्यात स्पष्ट म्हटले आहे की “CCTV फुटेज च्या स्टोरेज ची माहिती पडताळणी केली असता ती या विभागात उपलब्ध नाही.
प्रश्न असा निर्माण होतो की, शासन हजारो, लाखो रुपये खर्च करून शासकीय कार्यालयात CCTV कॅमेरे बसवतात मग या CCTV कॅमेर्यांचा डाटा नेमका का उपलब्ध होत नाही.
एखाद्या सामान्य माणसाने शासकीय कार्यालयात तक्रार केली किंवा काही भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ३५३ लावून अधिकारी मोकळे होतात आणि पुरावे म्हणून CCTV कॅमेरे फुटेज पण देतात, “बघा सदर इसम आमच्या कार्यालयात आला आहे व फुटेज मध्ये दिसत आहे”
पण जेव्हा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज सादर करुन एखाद अर्जदार CCTV कॅमेरे फुटेज माहितीची मागणी करतो तेव्हा मात्र डाटाबेसच् नाही, उपलब्ध नाही, CCTV कॅमेरे नादुरुस्त झाल्याने माहिती देता येत नाही असे कारणे देऊन माहिती देण्यास नकार दिला जातो.
याप्रकरणी वरिष्ठ कार्यालय दखल घेऊन काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.