<
पाचोरा : येथील पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकान दारानांनी कार्यसम्राट आमदार यांच्या गेल्या ५ वर्षातील कार्यपद्धतीवर खुश होऊन व त्यांच्या समस्यांचे वेळोवेळी निरासन करत असल्याने समस्त दुकानदारांनी आमदार किशोर पाटील यांना पुन्हा आमदार व्हावे म्हणून जाहीर पाठींबा दिला आहे. गेल्या ५ वर्षांपासून आमदार किशोर पाटील हे रेशन दुकानदारांच्या विविध अडचणीबाबत आमच्या सोबत असून त्यांच्यापासून आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. एवढेच नाहीतर आमच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी विधानभवनातही आवाज उडवला आहे असे सांगत सर्व दुकानदारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी सुनील पाटील तालुका अध्यक्ष (स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशन), सलीम रंगरेज शहर अध्यक्ष, नितीन राठी, ललित पुजारी,संजय महाले,अशोकबापू वाणी, आबा डॉक्टर,प्रदीपसींग परदेशी,अमोल दाभाडे,नवीन न्याती, रामदास पाटील, सुभाष पाटील,भालेराव, असिफ खान, शांताराम पाटील,बापू सोनार, नाना पाटील आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील पाटील शिवसेना संपर्कप्रमुख, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, समाधान पाटील,अनिल आबा पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.