<
पाचोरा-( प्रमोद सोनवणे )- सरकारच्या व्यापार धोरणांमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. जी.एस.टी. नोटबंदीच्या तुकलघी निर्णयामुळे लहान – मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास सोसावा लागला. सरकारच्या व्यावसायिक धोरणे, निर्णयां विरूध्द आता व्यापारी आवाज न उठविता सर्व सहन करीत आहे. त्यांच्या समस्यांवर सरकार प्रतिसाद देत नाही. बाजारात आणि व्यवसायात मंदी आहे.देशाची अर्थ व्यवस्था कोलमडली आहे.सर्वच क्षेत्रांचे खाजगी करण होत आहे. अश्या नाराजीच्या प्रतिक्रीया राष्ट्रवादी – काॅग्रेसच्या व्यापारी बैठकीत उमटल्या.दि. ६ रोजी आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ शहरातील व्यापार्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत व्यावसायिकांनी अडचणी व समस्या मांडण्यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी असावा. व्यापार्यांना त्रास होणार नाही म्हणुन शहरात गुंडागिरी दादागीरी नसावी अश्या अपेक्षा व्यक्त केल्या. संवाद साधतांना उमेदवार दिलीप वाघ केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयामुळे व्यापारी अडचणीत आले. शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी मिळाली नाही. तरूणांना रोजगार मिळाला नाही. व्यापार्यांमध्ये सत्ता परिवर्तनाची शक्ती असते. शहरात पालिकेची सत्ता आमदारांच्या नेतृत्वात असतांना रस्ते , स्वच्छता,आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या व्यापारी संकुले समस्या आहेत. राष्ट्रवादीने कधीच व्यापार्यांना लुबाडले किंवा फसविले नाही. त्यांच्या समस्यांसाठी आम्ही नेहमी व्यापार्यांच्या सोबत आहे व राहु .आमच्या सत्तेत कधीच व्यापार्याना त्रास होऊ दिला नाही. व्यापाऱ्याच्या समस्यां व मागण्यांसाठी सोबत आहे व राहु अशी ग्वाही दिलीप वाघ यांनी दिली यावेळी संजय वाघ, व्ही. टी. जोशी, नाना देवरे, सुभाष अग्रवाल चंदु केसवाणी, बापु सोनार, नंदु सोनार, मोहन अग्रवाल, संजय सिसोदीया , अश्पाक बागवान, राजेश मोर, राजु बोथरा , ललीत पटवारी , लक्ष्मणदास पुर्सनाणी, आबा सिनकर,वाणी समाज युवा अध्यक्ष संदिप महालपुरे, डाॅ. आलम देशमुख ,सिंधी समाजाचे प्रमुख पदाधिकारी मोटुमल नागराणी अर्जुनदास दाखणेजा , भोलाराम पंजवाणी , गूलाब केसवाणी, विनोद वाधवाणी , यांच्यासह राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आघाडी ,विविध सेलचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.