<
भडगाव-(वार्ताहर)-येथुन जवळच असलेल्या क. ता. ह. रा. पा. कि. शि. संस्था, भडगाव,संचलीत गो. पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथील खेळाडूंनी “छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंनी यश मिळवत नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात पार पडणाऱ्या नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी आपले नाव पक्के केले आहे. मुलींच्या ४ कि.मी.क्रॉसकंट्री स्पर्धेत “कु.निकीता अशोक सरदारने प्रथम तर कु.रुपाली राजेंद्र हिरे हिने द्वितीय स्थान पटकावले तसेच मुलांच्या ६ कि.मी.क्रॉसकंट्री स्पर्धेत चि.गौरव अनिल पाटील याने पाचवे स्थान ” प्राप्त करीत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,आर.एस.कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील, मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील, डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील, अनिल पवार, आर.ए.पाटील, किशोर चौधरी, माया मराठे, सोनाली सोनवणे, मनोज पवार, अरविंद देसले, चेतन भोसले, राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.