<
यावल/रावेर-(प्रतिनिधी) – आज पाल येथून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी चैतन्य लक्ष्मण बापू यांच्या आश्रमात नारळ वाहून व बाबा पीर फत्ते शाह वली यांच्या दर्गात चादर चढऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
पाल, गुलाबवाडी, मोरव्हाल, ताड जिन्सी, विश्राम जिन्सी, आभोडे खु, आभोडे बु या गावात प्रचार रॅली काढण्यात आली, या वेळी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सह रावेर-यावल मतदारसंघातील मान्यवर माजी सरपंच पुंडलिक सोनार, माजी सरपंच रमेश येवले, कृ उ बा स सभापती सचिन चौधरी, मुनाफ तडवी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, राजू तडवी, नगरसेवक कुर्बान शेख, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, भुरेखा तडवी, नासिर पठाण, प्रदीप जाधव, दिलीप जाधव, मनोज चौधरी, जखा राठोड, जितू लोहार, अतुल तडवी, रंगा पवार, पंकज वाघ, अनवर खाटीक, सद्दाम मण्यार, रफिक तडवी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.