<
जळगांव(धर्मेश पालवे)-जळगांव तसा विविध बाबतीत चर्चेत असणारा जिल्हा आहे. राजकीय, सामाजिक व खान्देश हा स्वतंत्र सांस्कृतिक वारसा असणारा हा एकमेव जिल्हा आहे. अश्याच, या गुणधर्मामुळे शहरातील शासकीय व प्रशासकीय इमारती ही गाजल्या आहेत, इमारती व प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी लोकांनी नाव लौकिक मिळवलेल्या या जळगांव जिल्ह्याला वेगळी ओळख आहे.
“शिवराम पाटील” हे व्यक्तिमत्व ही याच शहरातील नावाजलेल्या व्यक्तिमत्वापैकी एक आहेत. गेल्या १० ते १५ वर्षा पासून शिवराम पाटील येथील जनतेच्या अडी अडचणी सोडवत असून, न्याय देत आहेत.सामन्य नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षा,शासकीय योजना, प्रशासकीय कायदा व व्यवस्था प्रामाणिक मिळावी म्हणून थाळीनाद, उपोषण, आमरण उपोषण, पद यात्रा, मुंडन आंदोल, आणि पर्यायी शासनाशी व प्रशासनाशी भांडून आपली ओळख निर्माण केली आहे. शासनाच्या कोणत्याही जी आर चा अभ्यास ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आधी अभ्यास करून पाठपुरावा करतात. गेल्या काही वर्षांपासून शिवराम पाटील यांची “नजर” येथील झालेल्या प्रत्येक भ्रष्टाचारावर एखाद्या “सी सी टी व्ही” कॅमेरा सारखी खिळून असते. असा अनुभव जनतेने बोलून व लिहून दाखवला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवराम पाटील यांनी जळगाव शहरात अपक्ष उमेदवारी लढत आहेत. त्यांना यासाठी “सी सी टीव्ही कॅमेरा” हे निवडणूक चिन्ह मिळाले असून जिल्ह्यातील जनमानसात या बद्दल सकारात्मक चर्चा रंगली आहे. बुद्धिजीवि, तरुण, सुशिक्षित , आणि जळगांव विकासासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तींचे शिवराम पाटील यांना नेहमी समर्थन राहिले आहे, जर या विधानसभा निवडणुकीत शिवराम पाटील यांच्या बाजूने जनतेने शहरात कौल दिला तर शिवराम पाटील यांची “नजर” येथील शासन प्रशासन व राजकीय भ्रष्टाचारावर “सी सी टीव्ही कॅमेरा” सारखी अद्वैत खिळून राहील अशी सर्वत्र चर्चा होत आहे.