<
पाचोरा येथे शिवसेना-भाजप महायुतीचा विजय संकल्प मेळावा संपन्न, मतदारांची लक्षणीय उपस्थिती
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्यामुळे राज्यातील जनमत भाजप-शिवसेनेच्या बाजूने आहे. त्यामुळे पुन्हा युतीचा महाविजय होणार असून पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील हे शंभर टक्के पुन्हा निवडून येतील अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी व्यक्त केली. पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात ना. महाजन यांनी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात हे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर आप्पा पाटील शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील उपाध्यक्ष प्रा.अस्मिता पाटील अस्मिता पाटील भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील प्रताप हरी पाटील जिप सदस्य मधुकर काटे डी एम पाटील विकास तात्या पाटील भुरा आप्पा पाटील रावसाहेब पाटील पदमसिंग पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल (पाचोरा) अतुल पाटील (भडगाव) शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील उद्योजक मुकुंद बिल्दिकर सेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड दिनकर देवरे गणेश पाटील भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील सोमनाथ पाटील पंस सभापती बन्सीलाल पाटील व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन शहराध्यक्ष नंदू सोमवंशी प्रदीप पाटील उद्धव मराठे दीपक राजपूत ॲड.अभय पाटील गणेश परदेशी प्रकाश सूर्यवंशी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ राजेंद्र पाटील दत्ता सुमित पाटील हिलाल मेंबर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात भाजपा शिवसेना महायुती च्या शासन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मागील पाच वर्षात रस्ते पाणी विज आधी विषयात महत्वपूर्ण विकास कामे वेगाने पूर्ण झाले असून दुष्काळापासून कायमची सुटका करण्यासाठी नदीजोड प्रकल्प व पाणी पुरवठा योजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. घरकुल योजना उज्वला गॅस योजना आयुष्यमान भारत सारख्या आरोग्य विषयक योजना वृद्धापकाळ पेन्शन योजनेतील वाढ आधी लोकाभिमुख योजना राबविल्यामुळे जम्मत भाजप-सेनेच्या पाठीमागे आहे मोदींच्या नेतृत्वाने सर्जिकल स्ट्राइकचा अवलंब करून पुलवामा हल्ल्या चे जशास तसे ठोस उत्तर दिले 370 कलम रद्द करून जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन केला या निर्णयामुळे भारतीय जनता अभिमान व्यक्त करत आहे तर सक्षम सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे जगात आपल्या देशाचा मान वाढला आहे. परिणामी जनमानसात भाजप-सेनेचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत युतीला ज्या पद्धतीने घवघवीत यश मिळाले होते तसाच मोठा विजय विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा होणार आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून पाचोरा भडगाव मध्ये किशोर आप्पा पाटील यांचा विजय नक्की आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म निभावल्याने भाजप उमेदवाराला सव्वा चार लाख इतके राज्यातील दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाले होते ते उपकाराची आम्ही परतफेड करणार असून भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळतील असे सांगून काँग्रेस आणि राष्ट्रवादीलामहाराष्ट्रात 40 जागा जिंकणे देखील जिंकणे अवघड असल्याचे मत ना महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.राज्यातील निवडणूक निकालाविषयी मत व्यक्त करताना उत्तर महाराष्ट्रात सर्व युतीचे उमेदवार विजय मिळतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मेळाव्याला संबोधित करताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा हवाला देत पाचोरा भडगाव मतदार संघात भाजप-शिवसेनेचा प्रभाव कायम असून येथील मतदार विकासकामांच्या पाठीमागे आहे त्यामुळे या निवडणुकीत 50 हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी भाजपा-शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करत असल्याने पुन्हा विजय संपादन करणार असल्याचे ते म्हणाले.
शहरातील महापुरे मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्याला आमदार महाजन तत्पूर्वी भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील व्यापारी आघाडी चे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन जि प सदस्य मधुकर काटे रावसाहेब पाटील प्राध्यापक अस्मिता पाटील सदाशिव पाटील तसेच भडगाव चे राजेंद्र जिभाऊ गणेश परदेशी अमोल पाटील विकास तात्या पाटील ज्यांनी मेळाव्याला संबोधित करताना समयोचित विचार मांडले व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन आमदार किशोर पाटील यांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन केले शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ तसेच अपक्ष अमोल शिंदे यांच्यावर सडकून टीका केली नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले ॲड अभय पाटील यांनी अमोल शिंदे आणि कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून गंभीर टीका केली. या मेळाव्याला सुभाष अग्रवाल रवी केसवानी बालू अण्णा पाटील रवी पाटील चंद्रकांत धनवडे अग्रवाल रमेश बाफना बी डी पाटील डॉक्टर शांतीलाल तेली भगवान बंडू चौधरी हरी पाटील अजय जयस्वाल सुनील पाटील किशोर बारावकर नाना वाघ पतींगराव पाटील अनिल पाटील सुनिता पाटील डॉ.सुप्रिया पाटील सुनिता महाजन बेबाबाई पाटील यासह भाजपा-शिवसेना महाआघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.