Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.शिरीष चौधरी यांच्या प्रचार रॅलीला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मा.आ.शिरीष चौधरी यांच्या प्रचार रॅलीला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजपूर (प्रतिनीधी) – सातपुड्यातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी जनसेवेचा वारसा लाभलेल्या शिरीषदादा चौधरी यांच्या शिवाय पर्याय नाही, असे विचार तिळ्या, अंधारमळी, मोहमांडली या गावातील प्रचार दौर्‍यादरम्यान आदिवासी बांधवांनी व्यक्‍त करून या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिरीषदादांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या.
आज (दि९.) रोजी रोझोदा, कळमोदा, बोरखेडा, तिळ्या, अंधारमळी, मोहमांडली येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पी.आर.पी. (कवाडे गट), स्वाभिमान शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी आघाडीचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी रोझोदा येथे माजी सरपंच दीपक धांडे, रमेश महाजन, चिमन धांडे, संतोष टोंगळे, गुणवंत टोंगळे यांच्यासह रोझोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळमोदा गावी घनश्याम जावळे, सरपंच सौ.सरला पाटील, उपसरपंच वासुदेव बाक्षे, ग्रा.पं.सदस्य रोशन तडवी, बिसमिल्ला तडवी, अजित तडवी, वसंत वाघ, भरत कुंवर, प्रदीप वाघ, प्रमोद बोंडे, मुस्तफा तडवी, निजाम तडवी, सुलेमान तडवी, दगडू तडवी, हमीद तडवी, हेमराज बोंडे, चंद्रकांत बाक्षे, पराग बाक्षे, नितीन सपकाळे, विनायक बाक्षे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर बोरखेडा येथे बापू भारंबे, चंद्रकांत भारंबे, चंद्रकांत झोपे, फिरोज तडवी, समीर तडवी, न्याजुद्दीन तडवी, अमीर तडवी, समीर तडवी, सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तिड्या येथे माजी सरपंच अब्दुल तडवी, सुपडू तडवी, ग्रा.पं.सदस्य इस्माईल तडवी, कुर्बान तडवी, फरीद बुर्‍हाण, माजी पोलीस पाटील शावबा तडवी, किताब तडवी, जमाल तडवी, कमाल तडवी, गफूर तडवी, रहेमान तडवी, मुस्तफा तडवी, मोहमांडली येथे सरपंच नूरखा तडवी, जुम्मा तडवी, शहाबीर तडवी, शहादूर तडवी, मुस्तफा तडवी, इब्राहिम तडवी, फिरोज तडवी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, रावेर यावल काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, जि.प.सदस्या सुरेखा पाटील, पं.स. यावल गटनेता शेखर पाटील, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजू सुवर्णे, कृ.उ.बा.संचालक गोंडूभाऊ महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य योगेश पाटील, उस्मान भाई, ईस्माईल तडवी, किशोर चौधरी, पराग चौधरी, वसंत चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान काल (दि. 8) रोजी रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, उटखेडा, भाटखेडा या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या गावांत शिरीषदादांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ग्रामस्थांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयासाठी शुभेच्छा देवून ग्रामस्थांनी प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्‍त केला.
माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा बँक माजी संचालक राजीव पाटील, जि.प.सदस्या सौ.सुरेखा पाटील, यावल पं.स. गटनेता शेखर पाटील, रावेर कृ.उ.बा.स. सभापती डॉ.राजेंद्र पाटील, कृ.उ.बा.स. सभापती डी.सी. पाटील, कृ.उ.बा.स.माजी उपसभापती यशवंत धनके, रावेर पं.स. सदस्य योगेश पाटील, सुधाकर पाटील, माजी जि.प.सदस्या पुष्पा तायडे, पं.स.सदस्य सरफराज तडवी, माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, कुंभारखेडा सरपंच लताबाई बोंडे, पुष्पा जंगले, हेमांगी भंगाळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौ.चंद्रकला इंगळे, काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवरणे, तापी परिसर विद्या मंडळाचे सचिव एम.टी. फिरके, उपाध्यक्ष एस.के.चौधरी, आदिवासी नेते हमीद तडवी, किशोर चौधरी, आदिवासी सेवक रमजान तडवी, कामिल तडवी, सैय्यद जावेद जनाब, अकिलउद्दीन फारुकी, राजू तडवी, नरेंद्र पाटील, रशीद तडवी, रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, मसाका संचालक रमेश महाजन, ललित महाजन, कुंदन चौधरी, खेमा पाटील, माजी सरपंच किशोर चौधरी, अमोल चौधरी, राजू चौधरी यांच्यासह यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, रा.काँ.यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रा.काँ. रावेर तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, पी.आर.पी., स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.    

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा-भडगांव मतदार संघात पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येईल- ना.गिरीश महाजन

Next Post

पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo