<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील केसीई संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य प्रा. डाॅ . अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बीएड तसेच प्रथम वर्ष बीपीएड छात्र अध्यापकांच्या दीक्षारंभ ( स्वागतोत्सव) उत्साहात पार पडला. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी छात्र अध्यापकांना परिचय करून दिले. तसेच छात्र अध्यापकांनी देखील परिचय करून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डाॅ. अशोक राणे यांनी ‘दीक्षारंभ’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत महाविद्यालयाचा कामकाजाची माहिती दिली.छात्रअध्यापक मन्यार तसेच प्रीतीश पाटील य यांच्या कार्याचा कौतुक करीत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य डाॅ.राणे यांनी राष्ट्रीय वरिष्ठ स्पोर्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळविलेले प्रीतीश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल छात्रअध्यापक असलम मन्यार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार प्रा.डाॅ. शैलजा भंगाळे यांनी केले. यावेळी प्रा .डाॅ. शैलजा भंगाळे, डाॅ. वंदना चौधरी, डाॅ.प्रा. कुंदा बाविस्कर, प्रा . जयश्री पाटील प्रा. स्वाती चव्हाण, प्रा. सुनीता नेमाडे, प्रा . रामलाल शिंगाने, केतन चौधरी , पंकज पाटील आदींसह शिक्षणशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे छात्रअध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.