<
जळगाव-(प्रतिनिधी)-केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नावरात्र उत्सवानिमित्त छोट्या चिमुकल्यांनी विविध गाण्यावर ठेका धरत गरबा व दांडिया नृत्य सादरीकरण केले.
घागरा ,चुनरी , काठेवाडी , गुजराथी ,राजस्थानी अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी सर्वाना आकर्षित करून घेतले.सदर स्पर्धेसाठी शाळेतर्फे पाच दिवसाचे दांडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत दांडिया क्वीन लेखिता अतुल भंगाळे , दांडिया किंग रुद्राक्ष हर्षल दुसाने , उत्कृष्ट वेशभूषा वृषाली विशाल यादव व उज्ज्वल हेमंत खैरनार तसेच उत्तेजनार्थ गीतेश अनिल पाटील यांना पालक हर्षाली मिलिंद ढाके (जनमत प्रतिष्ठान ) यांच्याकडून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रशिक्षण हर्षाली ढाके तसेच उपशिक्षक योगेश भालेराव यांनी दिले , परीक्षण दिक्षा गुंठे व योगिता फेगडे यांनी केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षक सूर्यकांत पाटील व धनश्री फालक यांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी शालेय समन्वयक के.जी.फेगडे, मुख्या.रेखा पाटील पालक ,शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.