<
कोंग्रेसच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे यांच्या सह असंख्य अल्प संख्यांक महिला भगिनींचा भाजपात प्रवेश
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराला आता जोमाने सुरवात झाली असून इतर पक्षांच्या मानाने भारतीय जनता पक्षाने आता प्रचारात वेग घेतला असून पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी देशातील व राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी व मुस्लीम भगिनींसाठी ऐतिहासिक काम केले असल्याने तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व शहराचे आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मेहरूण येथील दीडशे ते दोनशे अल्पसंख्यांक महिला भगिनींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
या मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे होमेषाबी शेख, नाहेदाबी शेख, फौजीयाबी फातेमा, नसीम बानो, शाहीन बी जहांगीर, शमिनाबी दाउद, शाबेरा बी खान, शगुफा बी. खान, शहनाज बी. खान, फायमी दाबी खान, अ वाहन बी रमजान, माहेर अख्तर बी. शाहेदाबी, जमिनाबी पीरजादे, फिरोज बेगम, नफीस जीयोमोद्दिन, अल्ल्रारखी पीरजादे यांच्यासह असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ.सुरेश भोळे (राजू मामा) महिला आघाडी अध्यक्षा सौ.सुरेखा कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना भाजपाचा गमछा घालून भाजपात प्रवेश करून घेतला.
या प्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष्य महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांनी सांगितले कि, आपण सर्व अल्पसंख्यांक महिला भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला असून याला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या उद्येशानुसार मी सर्व अल्प्संख्यानंक समाजासाठी व बंधू भगिनींसाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले. अल्प्संखायांक भगिनींनी राजू मामांचा प्रचार घरोघरी जाऊन करण्याचा निर्धार या ठिकाणी केला.