<
जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वासती – गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटलांसाठी निवडणुक एकतर्फीच
जळगाव (स्वप्निल सोनवणे)- उमेदवारी अर्ज माघारीच्या नंतर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा भगवा झंझावात निर्माण झाला असुन १७५ पैकी ७२ गावांमध्ये भेटीगाठी देत प्रचारामध्ये जबरदस्त आघाडी घेतली आहे. पहिल्या पाच दिवसात कार्यकर्त्यांसोबत सर्वसामान्य नागरिक आणि मतदारही शिवसेनेचे प्रचारक बनल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाल्यामुळे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही निवडणुक एकतर्फी झाली आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार असुन मतदारसंघातील १६ पैकी ८ पंचायत समिती गणामध्ये प्रचाराची पहिली फेरी 5 दिवसातच पुर्ण झाली आहे. यात म्हासावद, बोरणार, नांदेड, साळवा, भोकर, कानळदा, पिंप्री, ममुराबाद या पंचायत समिती गणा मध्ये प्रचाररथ, सोशल मिडीया, जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे, गाव भेटी दरम्यान होणाऱ्या बैठका व कार्नर सभा, मागिल 5 वर्षातील गुलाबराव पाटील यांनी केलेली विकासकामे अशा सर्वच बाबतीत शिवसैनिक, भाजपा, रिपाई व महायुतीतील कार्यकर्ते प्रचार करतांना दिसुन येत आहेत. कार्यकर्त्यांसोबतच हजारो मतदारच शिवसेना व गुलाबराव पाटलांच्या प्रचारकाची भुमिका वठवत असल्याचे दिसुन येत आहे.
मतदारसंघात सर्व सामान्यांसाठी केलेला विकास आणि तळागाळातील जनतेपर्यंत सुखदुःखात संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
जनतेचे प्रेम हीच माझी श्रीमंती असून त्या श्रीमंतीच्या भरवशावरच आणि मतदारांच्या आशीर्वादाने मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल याची शास्वतीे आहे असे गुलाबराव पाटील यांनी रिधुर येथे झालेल्या मेळाव्यात सांगितले.
आज झालेल्या ममुराबाद पं स गणातील ममुराबाद, आवार, विदगाव,तुरखेडा, नांद्रा, खापरखेडा, डीकसाई, रिधुर या गावांमध्ये प्रचाराचा झंझावातात हजारो मतदारांशी संवाद साधला गेला.
प्रचार रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, संजय पाटील सर , गोपाल जिभाऊ पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, रामचंद्र बापू, रावसाहेब पाटील, जि प सदस्य पवन सोनावणे, गोपाल चौधरी, सचिन पवार, विलास सोनावणे, भाजपाचे लालचंद पाटील, नाना भाऊ सोनवणे, संजय घुगे, मुकेश सोनवणे , उपतालुकाप्रमुख प्रमोद सोनवणे, धोंडू जगताप , कमलाकर पाटील , पं.समिती सदस्य जना आप्पा पाटील (कोळी), प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, दुर्गादास मोरे, वासुदेव कोळी, दिलीप जगताप, रामेशअप्पा पाटील, संजय पाटीलसर, यांच्यासह सरपंच, सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे पदाधिकारी त्या-त्या गावातील कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ, मतदार व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.