<
जळगावात प्रथमच “राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम” स्पर्धेचे आयोजन
गेम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार बिझनेस चे धडे
जळगाव प्रतिनिधी – जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते या अनुषंगाने प्रथमच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन व चाणक्य आयोजत 23 व्या स्टुडंट मॅनेजमेंट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेची प्राथमिक फेरी जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात होणार आहे. व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी मागील 22 वर्षापासून आयमा व चाणक्य यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बँगलोर,पुणे, नवसारी या प्रगत शहरामध्ये मागील 22 वर्षापासून स्टुडंट मॅनेजमेंट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात यायचे. परंतु यावेळी प्रथमच जळगांव शहरातील सुपरिचित जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या लौकिकात पुन्हा भर पडली आहे. 22,23,24 ऑक्टोबरला सदर महाविद्यालयात या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीन ते चार विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी खान्देशातील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार आहे. तसेच या स्पर्धेत चाणक्य या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना वास्तविक जगातील बिजनेसच्या परिस्थिती दिल्या जातील. त्या परिस्थितीमध्ये स्पर्धकांना बिजनेस रिलेटेड निर्णय घ्यावे लागतील. उदा. उद्योगात कच्चा मालाचा कमी वापर, जाहीरातींवर कमी अधिक खर्च, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर, ग्राहकांच्या अपेक्षा व आदी निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसवर कसा होतो हे त्यांना चाणक्य सॉफ्टवेअरद्वारा कळेल तसेच त्यांनी स्पर्धेमध्ये घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसच्या मार्केटींग विभाग, फायनान्स विभाग, एच.आर. ऑपरेशनवर देखील कसा होतो हे त्यांच्या लक्षात येणार आहे.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना उद्योजकता निर्माण करणे, नेतृत्व कौशल्य तसेच निर्णय क्षमता वाढवणे आदी बाबी लक्षात येतात. त्यामुळे बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी मोठे आकर्षण असते. पहिल्यांदाच जळगांव शहरात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे असे रायसोनी इंन्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सागितले. सदर प्राथमिक फेरीतील विजेत्यांची तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ता. 30 नोव्हें रोजी अंतिम फेरी होणार आहे. याठिकाणी प्रथम विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रनरअप ट्रॉफी व हिरो मोटरबाईक आणि द्वितीय विजयी ठरलेल्या स्पर्धकांना रनरअप ट्रॉफी व रोख रक्कम 30,000 रुपये तर तृतीय ठरलेल्या स्पर्धकांना रनरअप ट्रॉफी व रोख रक्कम 20,000 रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रायसोनी महाविद्यालयातील प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे यांच्या 9850628305, 9503067117 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी केले आहे.