<
जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर भुमिका घेऊन नेहमी प्रयत्नशील, जनमाणसात वेगळी ओळख
जळगांव-(धर्मेश पालवे):-शहरात येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, प्रमुख पक्षाच्या जोडीलाच अपक्ष उमेदवाराच्या प्रचार सभेला ही सुरवात झालेली आहे. लोकपाल सत्याग्रहात सहभाग असलेले, शहरातील विविध समस्यांना न्याय देणारे, लोकसेवक व जनसेवक अशी वेगळी ओळख असलेले जळगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा प्रचार धडाक्याने शहरात सुरु आहे. दि १० तारखेला सकाळी ११ वाजता भास्कर मार्केट येथून प्रचारास सुरवात करून, शहरातील विविध ठिकाणी शिवराम पाटील सभा घेत आहेत. आज नेहमी प्रमाणे पिप्राळा येथे मुख्य चौकात सभा घेऊन जनसंवाद साधण्यात आला. सदर सभेत मतदारांच्या गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्थानिक मुद्यावरून राजकीय नेत्यांना धारेवर घेत, शहरातील हुडको, रस्ते, पूल, आरोग्य, बेरोजगारी, व शेतकरी आत्महत्या या विषयावर भाष्य करून उपस्तीतांचे लक्ष वेधुन मतदारांना संबोधित केले. यावरू वाढत्या गर्दीने व वाढत्या लोकप्रियतेचा फायदा नक्कीच शिवराम पाटील यांची वोटबँक भरणार आहे असा सूरही जनमानसात उमटत आहे.
अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांच्या झंझावाती प्रचाराने आमदारांसह सर्वच उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवराम पाटील यांनी शहरातील जनसामाान्यांना नेहमी भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जनतेलाा नेहमी बोलते देखील केले आहे. सामान्यांचा आमदार म्हणून निवडून दिल्यास जळगांवकर नक्कीच समस्यांच्या जाळ्यातून बाहेर पडतील अशी चर्चा जागृत मतदारांकडून जोर धरू लागली आहे.