<
एरंडोल(प्रतिनीधी)- जळगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या इंडिका गाडीने कट मारले ने दिनांक १०रोजी रात्री ९वाजता हायवे क्रमांक६ एरंडोल बस स्टँड समोर जळगावच्या दिशेने एरंडोल धरणगाव चौफुली मार्ग घरी जाण्यास दुचाकीस्वार किशोर पाटील कुंझरकर हे आपल्यादुचाकीने जात असताना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा पत्रकार मित्र किशोर पाटील कुंझरकर थोडक्यात बचावले असून उजवा हात व पायाचा गुडघा यास जबर मुक्कामार लागला आहे. पायाचा पंजा सोलला आहे. सुदैवाने या घटना प्रसंगी अपघातस्थळीमागून कुठलेही वाहन नसल्याने जीवित हानी टळली असून त्यांचा पुनर्जन्म झाल्याने अनेकांनी भेटीगाठी घेत आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. सतत समाजव्यवस्थेतील शिक्षक पत्रकार पदवीधर शिक्षक गोरगरीब वंचित घटकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सदैव पुढाकार घेऊन मदतीसाठी तत्पर असलेले किशोर पाटील कुंझरकर यांना ते सातत्याने करीत असलेले पुण्यकर्म आडवे आल्याचे बोलले जात आहे.नॅशनल हायवे नंबर६ पुणे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पद्मालय हॉस्पिटल या ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल वाघ त्यांनी तत्काळ प्रथमोपचार केले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सर्वांच्या आशीर्वादाने मृत्यूच्या दाढेतून जवळून मृत्यू पाहून परत आलो असून पुढील उर्वरित आयुष्य शंभर टक्के अध्यात्म व समाज सेवेसाठी अर्पण करीत असल्याचे भेट घेतली असता किशोर पाटील कुंझरकर बोलताना म्हणाले.