<
जळगाव-(जिमाका) – देशाचे प्रधानमंत्री रविवार, 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची नियोजित सभेचे ठिकाण असलेल्या येथील भारत फोर्जचे ग्राऊंड परिसर व विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट, एअरक्राफ्ट, प्रायव्हेट हेलीकॉप्टर्स, पॅरामोटर्स व हॉट एअर बलून्स व तत्सम हवाई साधने उड्डाणास व प्रवेशास बंदीचे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारत फोर्ज ग्राऊंड परिसर व जळगांव विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किमी पर्यंत अंतरावर 12 ऑक्टोंबर, 2019 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी दुपारी 15.00 वाजेपावेतो हे आदेश लागू करण्यात येत असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.