<
भडगांवात व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न
भडगांव(प्रमोद सोनवणे)- भडगांवात आज पाचोरा रोड नारायण मंगल कार्यालयात राष्ट्रवादी -काॅग्रेस(आय)कवाडे गट(पी.आर.पी)व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मा.आ.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगांव येथे व्यापारी नांत प्रगतीच..अखंड विश्वासाच या नुसार भडगांव येथिल व्यकंटेश प्लाझा,बढे काॅम्लेक्स,इंदर काॅम्लेक्स,दत्ता आबा शाॅपींग काॅम्लेक्स,तसेच मेडिकल असोसिएशन, पाजीपाला व्यापारी, फ्रुट व्यापारी, हाॅटेल्स चे मालक, मार्बल दुकानदार, मोबाईल शाॅपी चे दुकानदार, किराणा दुकानदार, डाॅक्टर,सहभागी झाले होते. या व्यापारी मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी प्रकाश भंडारी होते. यावेळी विनय जकातदार यांनी जी.एस.टी मुळे व्यापारी अडचणीत सापडला आहे. तसेच या सरकारने शरद पवारांना ईडीचा धाक दाखवून अडचणीत आणण्याचे षडयंत्र केले असे मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते दत्ता आबा पवार यांनी आपल्या भाषणात मोदी भाऊ जगू देणार नाही १९८० साली २०० तोला सोने होते आज ४०००० हजार सोने आहे एक मुलगाही नोकरीला लागत नाही. देशाची अर्थव्यवस्था कोलंमडली आहे.
जाकीरशेठ कुरेशी म्हणाले की भडगांवच्या व्यापारांचा मा.आ.दिलीपभाऊ यांच्यावर पुर्ण विश्वास आहे. देशाची अर्थव्यवस्था खराब झाली असून हे सरकार हिंदु मूस्लीम विवादावर बिगाड करण्याचे काम करत आहे. सुरेश भंडारी ३० ते ४०वर्षापासून धंद्यात आहोत दहा वर्षाअगोदर आम्ही सुखी होतो आज मात्र नाही आहोत. भडगांवचा व्यापार वृद्धीगत होण्यासाठी दिलीप भाऊ नक्कीच प्रयत्न करतील. मा.आ.दिलीप भाऊ यांनी आपल्या भाषणात भडगांव पाचोरा व्यापारी मध्ये नाराजीचा सुर असून जीएसटी मुळे व्यापारींना अडचणी निर्माण होत आहेत. सध्याचे सरकार व्यापारांना वेठी धरत आहे. दुष्काळ निधी म्हणुन पेट्रोल व डिझेल वर कर आकारून लादले गेले आहेत. व्यापारी वर्गाला व तरूण वर्गाला दिलासा देण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही भाऊंनी दिली. भडगांव व भडगांव पेठचा पुलाची स्थीती खराब असून त्याला नविन करणे होते मात्र आमदारांनी फक्त घोषणाच केल्या. या मेळाव्यास मा.आ.दिलीपभाऊ वाघ तसेच मेळाव्याचे अध्यक्ष प्रकाश भंडारी,नानासो संजय वाघ, दत्ता आबा पवार, भैय्यासाहेब पाटील,संतोष जाधव, हर्संषल पाटील, संजय पाटील, जाकीर कुरेशी, समीर जैन, डाॅ.सुनिल पाटील, वेलजी भाई, शामदादा भोसले, महेश पाटील, प्रशांत बडगुजर, शैलेश तोतला,पुनमचंद जैन,गणपत शितवाणी, सुरेश भंडारी, रविंद्र पाटील, कैलास राठोड, डाॅ.प्रफुल्ल पाटील,महेंद्र चैधरी,संजय पाटील,पारस देशमुख,प्रकाश पाटील,दिपक पाटील,नखराज सोनवणे, स्वप्निल पाटील,सतिष चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.