<
जळगांव(प्रतिनिधी)- शासनाच्या प्लास्टिक मुक्त भारत या अभियानात सहभाग व जिल्हाधिकारी डॉ. अविनाशजी ढाकणे व म.न.पा आयुक्त यांचा आव्हानाला प्रतिसाद देत तसेच जळगांव शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी व स्वच्छता अभियान ला अल्पस्वरूपात हातभार लावण्यासाठी शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत कागदी पिशवी बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच कागदी पिशवी बनवले व परिसरातील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, नागरिक यांना या कागदी पिशव्या वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी १५० पिशव्या बनवून कार्यानुभव विषय प्रात्यक्षिक परीक्षा मध्ये घेण्यात आला. शिव कॉलनी परिसरातील राजस्थानी स्वीट मार्ट या दुकानदारने विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कागदी पिशव्या बनवले म्हणून त्यांना खाऊ देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी पिशवी वाटप करतांना कागदी पिशवीचा वापर करून पर्यावरणाला हातभार लावला असा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना व व्यावसायिकांना दिला. कागदी पिशवी वाटप करत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना बघून परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. या कार्यशाळेला संस्था अध्यक्ष तथा ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.वसाने यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेचे आयोजन व नियोजन शाळेच्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल व सौ. सविता ठाकरे यांनी केले.