<
भडगाव पाचोरा मतदार सघांतील व्यापारीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा/भडगाव-(प्रमोद सोनवणे) – पाचोर/भडगाव मतदार संघाचे शिवसेना भाजपा रिपाई (आ) रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती, एकलव्य संघटना व मित्रपक्ष सह महायुतीचे उमेदवार आ. किशोरआप्पा पाटील यांच्यासाठी पाचोरा शहरात व्यापारी बांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहत जैन पाठ शाळेत पुनमचंद मोर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला. यावेळी आ. किशोर पाटील व्यापारी आघाडीचे भाजपचे कांतीलाल श्रीश्रीमाळ, मुकुंद बिल्डींकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, नारायनदास पटवारी, सुनील पाटील, दीपक सावा, दिनेश अग्रवाल, नासिर बागवान रतनलाल संघवी, भोटुमल नागरणी, अर्जुनदास दाखणेजा,उत्तम बागड, जगदीश पटवारी, बापू सोनार, आयुब बागवान दत्ता पाटील, नंदू सोमवंशी, राजेंद्र भोसले, भरत शेठ, मेघराज केसवणी, मूर्तिजाशेठ बोहरी, भरत शेंडे, शरद महालपूरे, गंगाराम तेली, शाम खंडेलवाल, रवी केसवणी, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुरेश पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रमोद ललवाणी, यांचेसह शेकडो व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुकुंद बिल्दीकर यांनी पाचोरा शहरात गेल्या ५ वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा सांगून भविष्यातील प्रस्तावित कामांची माहिती सांगितली. भाजप व्यापारी आघाडी चे कांतीलाल श्री. श्रीमाळ यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी विशद करून आ. किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा गौरव केला. यावेळी आ. किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात व्यापारी बांधवांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याने समाधान व्यक्त करून केलेल्या कामांची माहिती दिली. यात शहरातील पाणीपुरीवठा योजना १८५ कोटीची गिरणा धरणाहुन आणण्याची योजना प्रस्तावित केली, ७० कोटींची भूमिगत गटार योजना, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र भूमिगत गटार पूर्ण झाल्यानंतर ८२ कोटीचे रस्त्यांचे काम काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल. भडगांव पाचोरा तालुका खर्या अर्थाने लोड शेडींग मुक्त झाला आहे. २०१४ पुर्वि बारा बारा तास विजेअभावी अनेक छोटे मोठे उद्योग बंद राहायचे, उद्योगासाठी जनतेच्या विकासासाठी विज उपलब्ध नसल्याने विकास आणि प्रगती मतदार संघाची खुंटलेली होती, पण आज तशी परिस्थिती राहीलेली नाही, मी आमदार झालो तेव्हा पहीला प्रश्न विजेचा सोडविला व पाचोरा भडगाव तालुका खर्याअर्थाने लोड शेडींग मुक्त करून दाखविला असे सागण्यात आले.