<
निवडणुकीचे सुटले वारेइकडे तिकडे प्रचार धुमारेरॅलीतुन देती मतदान नारेविचार करून मत द्यारे सारे ||१||
मतदानाचा हक्क गड्या बजवपात्र होशी वय अठरा झाले की लोकशाहीची ही सत्ता टिकवतरुण म्हातारे ताई माई आक्की ||२||
मतदार राजा जागा हो आताहीतुझे एक मत महत्वाचे कितीदेशाचे भविष्य उज्ज्वल घडवीमतदान करण्याची नको भीती ||३||
सहज सोपे झाले रे मतदानइलेक्ट्रॉनिक वोटर मशीननेफक्त बोटाने बटण दाबायचेहव्या त्या उमेदवारा समोरचे ||४||
योग्य निर्णय तुझ्याच हातामध्येप्रलोभनासाठी बळी न पडतासंधी मतदानाची खऱ्या सेवकापाच वर्षांसाठी असते ही सत्ता ||५||
मतदान करणे हक्क समजसंविधानानेच दिला अधिकारहक्क कर्तव्याची जाणीव मनासीठरव नक्कीच मतदान करणार||६||