<
फैजपूर(प्रतिनिधी-मयूर मेढे) सद्गुरूंच्या अंगी असलेल्या गुणांचा सन्मान करा तेच विचार आचरणात आणणे आवश्यक आहे त्यानेच मनातील अहंभाव सुद्धा दूर होतो अहंभाव निर्माण झाल्याने विवेकबुद्धी नष्ट होते मनुष्य आपली जबाबदारी विसरतो अशावेळी सद्गुरूंचे वचन स्मरण आचरण केल्यास परमेश्वराच्या माऱ्यापासून वाचता येईल .पोट दुखी असल्यास डॉक्टरांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून पोट दुखी थांबत नाही त्यासाठी औषधे घ्यावी लागते परमार्थही पाळावी लागतात त्याचप्रमाणे संसारातील दुःखे दूर करण्यासाठी सद्गुरूंची केवळ वंदन करून चालणार नाही तर त्यांचे विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी येथील ल ससतपंथसंस्थान मंदिरातील आयोजित गगुरूपौर्णिमा सोहळ्यात केले पंचक्रोशीसह महाराष्ट्रभरातून मध्यप्रदेश गुजरात अमेरिकेतून आलेल्या भाविकांशी बोलतांना गुरुभक्ती व परमेश्वर भक्ती करतांना मनात निर्माण केलेली भाव मूर्ती जागृत करून आचरणात परमेश्वर पाहण्याचीही गरज असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी भाविकांना उपदेश दिला.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आगम चरित्र गुरुचरित्र पारायणाची समाप्ती गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला करण्यात आले गुरुपौर्णिमेच्या सकाळी 5 वाजता घटपुजा करून परमेश्वर व सद्गुरूंना अभिवादन केले गेले सद्गुरू हे नदी वृक्षाप्रमाणे निस्वार्थी परोपकारी करणारे असल्याने त्यांच्या कृतींचा आदर करणे आवश्यक आहे त्यासाठी तन-मन-धनाने सहकार्याची कृती समाजाने ठेवले पाहिजे सारे काही समष्टीसाठी हा भाव त्यांचा असतो आपणही तो जपला तर मीपणाचा नाश होईल असे आचार्यांनी बोलताना सांगितले. यावेळी आ हरीभाऊ जावळे, माजी आ शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, आ राजुमाम भोळे, नगराध्यक्ष महानंदा होले यासह हजारो भाविकांनी गुरूंच्या दर्शनासाठी सकाळ पासून मंदिरात गर्दी केली होती.गुरुवंदना कार्यक्रमाच्या प्रारंभी शेखर महाजन यांनी सपत्नीक पूजन केले तर केशव मोरे व श्रीमती सुमनबाई मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला भाविकांच्या वतीने श्रीकांत रत्नपारखी यांनी प्रतिनिधी मनोगत व्यक्त करत गुरूंना अभिवादन केले सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी केले सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.